Top News

प्रा. उज्ज्वल पाटील यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यपदी नियुक्ती


धरणगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील विद्यापीठ रासायनिक तंत्रज्ञान संस्था (UICT) मधील जनरल इंजिनिअरिंग विभागप्रमुख तथा करिअर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. उज्ज्वल पाटील यांची कुलगुरूंच्या नामनिर्देशनातून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

प्रा. पाटील हे UICT च्या बी.टेक. केमिकल इंजिनिअरिंगच्या २००३ च्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या समन्वयातून चार रोजगार मेळाव्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी जोडणे, त्यांची रोजगारक्षमता वाढविणे तसेच शैक्षणिक संस्था आणि उद्योगांमधील समन्वय दृढ करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

विद्यापीठाच्या प्रशासकीय व धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यवस्थापन परिषदेवर त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या अनुभवाचा विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मनोगत: या यशाचे संपूर्ण श्रेय माझे आई-वडील आणि आदरणीय गुरुवर्य प्रा. आर. डी. कुलकर्णी सर यांना समर्पित करतो. आई-वडिलांचे आशीर्वाद, त्याग व संस्कार, तसेच कुलकर्णी सरांचे मार्गदर्शन, विश्वास आणि प्रेरणा यांमुळेच हा प्रवास शक्य झाला. त्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. माझ्या प्रत्येक यशामागे त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आहे, अशी भावना प्रा. उज्ज्वल पाटील यांनी व्यक्त केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज