नागभीड प्रतिनिधी संजय बागडे : नागभीड, जि. चंद्रपूर येथील लखन बालकदास मसराम यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली आहे. या निवेदनाच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणाची नियमाप्रमाणे चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या पत्रानुसार, नागपूर विभागाच्या नगर परिषद प्रशासन विभागातील कामकाजासंदर्भात सचिन नरहरी ढोंगे, उल्केश सुधाकर गुरुपडे, संजय देवराव सयाम, कैलास हरिभाऊ डुबरे, प्रितम मदन मंडपे व अशोक भुजजी रामटेके हे व्यक्ती ग्रामपंचायत बोधली, तुकूम व सुलेझरी येथे कार्यरत नसतानाही त्यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकरणात श्रीमती संघमित्रा ढोके यांच्या कार्यकाळातील समावेशनाचीही चौकशी करून, त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत संबंधित कागदपत्रांसह सादर करण्यात आली असून, मा. मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार निवेदनावर नियमानुसार कार्यवाही करून अर्जदारास आवश्यक ते सहकार्य करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे संबंधित ग्रामपंचायतीतील नियुक्त्या व कागदपत्रांच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशीतून नेमके काय सत्य समोर येते याकडे लक्ष्य लागले आहे
टिप्पणी पोस्ट करा