प्रतिनिधी - संजय बागडे
लोककलेच्या संवर्धनासाठी नाट्यप्रयोगांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक– महेंद्र ब्राह्मणवाडे
ब्रह्मपुरी तालुक्यातील अऱ्हेरनवरगाव येथे श्री दुर्गा नाट्य कला मंडळाच्या वतीने दुर्गोत्सवानिमित्त ‘आहुती’ या तीन अंकी नाटकाचे यशस्वी सादरीकरण करण्यात आले. या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोककलेच्या संवर्धनासोबतच सामाजिक प्रश्नांवरही भाष्य केले.
यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून आपले भविष्य घडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. तसेच आगामी दुष्काळी परिस्थितीचा विचार करता प्रत्येकाने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असेही त्यांनी सांगितले. झाडीपट्टीतील नाट्यपरंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वाचा भाग असून, नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून ही लोककला जिवंत ठेवण्याचे कार्य केले जात आहे. या कलेला अधिक व्यापक व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर होते. यावेळी ब्रह्मपुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेशभाऊ मिसार, नगरसेवक मोंटूभाऊ पिलारे, राकेशभाऊ पडोळे, प्रकाशभाऊ खोब्रागडे, चंद्रकांतभाऊ बावनकुळे, नगरसेविका सौ. मायाताई ठेंगरे यांची सत्कारमूर्ती म्हणून उपस्थिती होती. निखीलभाऊ वारजुरकर यांनी सहउद्घाटक म्हणून उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाला भ.वि. जाती ब्रह्मपुरीचे तालुकाध्यक्ष सुधीरभाऊ शिऊरकार, कृषी सल्लागार संघटनेचे तालुकाध्यक्ष वामनजी मिसार, पिंपळगावचे माजी सरपंच सुरेशजी दुनेदार, मुकुंदाजी राऊत, मंगलजी पिल्लेवान, पत्रकार अमरदीपजी लोखंडे, सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष बाळकृष्णजी ठाकरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अरविंदजी ठेंगरे, राहुल ठिकरे, गजानन उरकुडे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा