Top News

धरणगावात जागृती युवक मंडळातर्फे रावण दहन उत्साहात

धरणगाव : जागृती युवक मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता मरीमाता मंदिर परिसरात तेली तलावाच्या काठावर रावण दहनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. फटाक्यांची आतषबाजी, वाद्यांचा गजर आणि उत्साही वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.

मंडळातर्फे गेल्या ४१ वर्षांपासून नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी रावण दहनाची परंपरा जपली जात आहे. यंदा ११ ऑक्टोबरपासून नऊ दिवस घटस्थापना, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, गायन, गरबा-रास आणि सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी. आर. पाटील, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे अध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, माजी गटनेते विनय भावे, गटनेते विलास महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील नेते मोहन नाना पाटील आणि अजितदादा गटाचे दीपक भाऊ वाघमारे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले.

यावेळी अ‍ॅड. वसंतराव भोलाणे, पुनीलाल आप्पा महाजन, भाजपचे सोशल मीडिया प्रमुख प्रवीण महाजन, भीमराव पाटील, रावण दहन समितीचे अध्यक्ष आनंद पैलवान, मंडळाचे अध्यक्ष सुमित महाजन, जितेंद्र पाटील, पुंडलिक पाटील, किशोर महाजन पैलवान, ज्येष्ठ पत्रकार के. आर. महाजन, भगीरथ माळी, वाल्मीक पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज