![]() |
| महापौर सौ. दीपमाला काळे शस्त्र पूजन करताना |
जळगाव :- आज विजयादशमीच्या निमित्ताने शहरातील नवीपेठ येथे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखा, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, आणि गोदावरी फाउंडेशन तर्फे " शस्रपूजन सोहळा " आयोजित करण्यात आला होता.
हा सोहळा सकाळी 10:30 वाजता सुरु झाला. यावेळी प्रभाकर नृत्य अकादमीच्या वतीने महिषसूर मर्दीनी स्तोत्र वर नृत्य सादर करण्यात आले, तसेच जळगाव लोकसभा खासदार स्मिताताई वाघ, आमदार श्री राजुमामा भोळे, महापौर सौ. दीपमाला काळे, सनातन संस्थेचे प्रसार सेवक सदगुरु श्री. नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री महेश पाठक, रणरागिणी शाखेच्या कु. सायली पाटील, कु. धनश्री दहिवदकर हे उपस्थित होते.
यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की रणरागिणी चा उपक्रम स्तुत्य असून असे उपक्रम आजच्या पिढीला आवश्यक आहेत, हे उपक्रम प्रत्येक शाळा, महाविद्यालयात पण शिकवले गेले पाहिजे, मी नेहमी समितीच्या कार्यक्रमाला येत असते. महापौर दीपमाळा काळे म्हणाल्या की, प्रत्येक महिलेने स्वतः रणरागिणी बनले पाहिजे, अशा उपक्रमात सहभागी झाले पाहिजे, आपल्यावर येणारे संकट असो की धर्मावर विरोध हा करायलाच पाहिजे, म्हणून दरवर्षी प्रमाणे मी याही वर्षी आवर्जून कार्यक्रमात सहभागी होत असते.पाळधी ता. धरणगाव येथे ही पुणे येथील अधिवक्ता आणि सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट सर्वेश मेहेंदळे, जि. प सदस्य प्रताप पाटील, यांच्या उपस्थितीत शस्रपूजन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला हिंदु विधिज्ञ् परिषदेचे अधिवक्ता निरंजन चौधरी, योग वेदांत समितीचे अनिल चौधरी यांच्या सह असंख्य महिला आणि मुली उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा