धरणगावच्या नगरसेवकाची राज्यस्तरावर नियुक्ती; सामाजिक क्षेत्रातून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव
भारतीय पोलीस दलातील महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचे हक्क, त्यांच्या समस्या आणि न्याय्य मागण्यांसाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या राज्य प्रदेश संघटकपदी धरणगाव नगरपालिकेचे नगरसेवक सुनीलभाऊ चौधरी यांची, तर जळगाव जिल्हाध्यक्षपदी साळवा येथील कल्पनाताई गरीबदास अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धुळे येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर यांनी एकमताने या नियुक्त्या जाहीर केल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुनीलभाऊ चौधरी आणि कल्पनाताई अहिरे यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.
सुनीलभाऊ चौधरी हे कर्तव्यदक्ष, तत्पर आणि नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले नगरसेवक म्हणून परिचित आहेत. नागरिकांची सेवा आणि सामाजिक कार्याचा वसा त्यांनी जपला आहे. तर कल्पनाताई गरीबदास अहिरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी असून सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
दोन्ही मान्यवरांवर सोपविण्यात आलेल्या नव्या जबाबदारीमुळे संघटनेच्या कार्याला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा