Top News

तळईतील शाळांजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी; कासोदा पोलीस स्टेशन व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


तळई, ता. एरंडोल, जि. जळगाव :

तळई गावातील माध्यमिक विद्यालयाजवळील चौक तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) तातडीने बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तळई माध्यमिक विद्यालयाचे संचालक मंडळ व ग्रामस्थ तळई यांच्या वतीने कासोदा पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.

तळई येथील माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेच्या परिसरातून वाहनांची वेगाने ये-जा होत असल्यामुळे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गतिरोधक नसल्यामुळे दोन ते तीन दिवसांपूर्वी तळई गावात अपघात घडला. भविष्यात अशा प्रकारचे अपघात होऊन कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये, यासाठी संबंधित प्रशासनाने वेळीच योग्य ती दक्षता घ्यावी, अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.

शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे माध्यमिक विद्यालयाजवळील चौक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ तातडीने गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. संबंधित प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी संचालक मंडळ व ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी अध्यक्ष दादासाहेब यशवंत खुशाल पाटील, सचिव साहेबांचे चिरंजीव डॉ. अभिजित राजेंद्र चौधरी, सामाजिक सेवक व सभासद आदरणीय गजानन शिवदास माळी, सामाजिक कार्यकर्ते निलेश उत्तम पाटील, आबासाहेब राजपूत आणि तुषार बागुल उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे अनमोल जीव सुरक्षित राहावेत, भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये आणि अपघात टाळता यावेत, यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने गतिरोधक बसविण्याची कार्यवाही करावी, अशी तळई माध्यमिक विद्यालयाचे संचालक मंडळ व ग्रामस्थ तळई यांच्या वतीने नम्र विनंती करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज