धरणगावात आदिशक्ती भवानी माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम; रांगोळीने सुशोभीकरण
धरणगाव, प्रतिनिधी : आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धरणगाव येथील आदिशक्ती भवानी माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम व रांगोळी सुशोभीकरण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमामुळे मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता आणि परिसर स्वच्छ व आकर्षक करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील, युवा नेते प्रतापराव पाटील आणि नगरसेवक पप्पू भाऊ भावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते किरण भाऊ महाजन आणि देशप्रेमी महिला मंडळाच्या संपूर्ण टीमने या मोहिमेत सहभाग घेतला. मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग स्वच्छ करून परिसरात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या. त्यामुळे मंदिर परिसराला प्रसन्न व भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक स्थळांची स्वच्छता राखणे आणि परिसराचे सुशोभीकरण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा