Top News

धरणगावात नारीशक्तीचा जयघोष; श्री बालाजी महाराजांच्या ऐतिहासिक रथाचे पूजन

धरणगाव : येथील श्री बालाजी महाराज संस्थानाच्या १५० वर्षांहून अधिक जुन्या परंपरेचा वारसा लाभलेल्या ऐतिहासिक रथाचे विजयादशमीनिमित्त भक्तिभावात पूजन करण्यात आले. यंदा महिलांना रथ ओढण्याचा बहुमान मिळाल्याने सोहळ्यात नारीशक्तीचा जयघोष पाहायला मिळाला.

खासदार स्मिता वाघ, पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगराध्यक्ष लीलाताई चौधरी, उपनगराध्यक्ष रूपाली महाजन यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत रथपूजन पार पडले. मंदिरातील गणेश पुराणीक यांच्या मंत्रोच्चारात पूजाविधी संपन्न झाला.

या वेळी महिलांनी हातात भगवे झेंडे घेत टाळ-मृदंगाच्या गजरात उत्साह व्यक्त केला. आजी-माजी नगरसेविका, महिला भगिनी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

रथोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी बालाजी वाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील, कार्याध्यक्ष जीवनसिंह बयस, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, सचिव प्रशांत वाणी, खजिनदार किरण वाणी यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज