महिलांच्या स्वसंरक्षणाचा आणि सक्षमीकरणाचा संदेश देणार
जळगाव (प्रतिनिधी) : विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेतर्फे मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जळगाव शहरातील पी. के. आर. टॉकीजसमोर, महानगरपालिकेजवळ शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याच्या सामाजिक परिस्थितीत महिलांची सुरक्षा हा चिंतेचा महत्त्वाचा विषय बनला आहे. महिलांमध्ये स्वसंरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि प्रसंगावधानाचे महत्त्व पटवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्रपूजनातून शौर्य, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देण्यात येणार आहे. तसेच महिला सुरक्षा व सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला जळगाव शहरातील महिला, युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. सायली पाटील यांनी केले आहे. तसेच गोदावरी फाउंडेशनच्या केतकी पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Post a Comment