![]() |
| कलाविष्कार, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा सुरेख संगम; नगरसेवक सुनीलभाऊ चौधरी व सौ. सुरेखा चौधरी यांना आरतीचा मान! |
धरणगाव, प्रतिनिधी : भारतीय संस्कृती आणि पारंपरिक कलेचा सुंदर आविष्कार घडविणाऱ्या त्रिमूर्ती ग्रुप, न्हावी गल्ली, धरणगाव यांच्या वतीने आयोजित रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेतून, आकर्षक रंगसंगतीतून आणि कलात्मक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक ८ चे लोकप्रिय नगरसेवक सुनील पंढरीनाथ चौधरी व सौ. सुरेखा सुनील चौधरी यांना आरतीचा मान मिळाला. तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून गायत्री चौधरी व प्राजक्ता गुजर यांनी काम पाहिले.
🏆 स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
🥇 प्रथम क्रमांक – सौ. जागृती चौधरी
🥈 द्वितीय क्रमांक – कु. ऋतू राठोड
🥉 तृतीय क्रमांक – कु. काव्य ठाकूर
🏅 चतुर्थ क्रमांक – नयन, सिद्धेश व मोहित राज
या स्पर्धेत योगिता फुलपगार, रिद्धी पाटील, नंदिनी पवार, पायल फुलपगार, नंदिनी ठाकूर, दीपाली फुलपगार, रितेश फुलपगार यांच्यासह अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.
नवोदित कलाकारांना प्रोत्साहन, पारंपरिक कलेचे संवर्धन आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव करणारा त्रिमूर्ती ग्रुपचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले, तर सहभागी स्पर्धकांच्या कलात्मकतेचेही विशेष कौतुक करण्यात आले.

Post a Comment