ZRUCC सदस्य प्रतीक जैन यांची पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत मुंबईत भेट
धरणगाव, प्रतिनिधी : धरणगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा बलाची (RPF) आउट पोस्ट सुरू करण्यात यावी, अशी मागणी ZRUCC सदस्य प्रतीक जैन यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई येथे पश्चिम रेल्वेचे महानिरीक्षक (IG) तथा प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त (PCSC), रेल्वे सुरक्षा बलाचे श्री. अजय सादानी यांची भेट घेऊन चर्चा केली.
धरणगाव रेल्वे स्टेशनवर RPF आउट पोस्ट सुरू झाल्यास स्थानिक नागरिकांसह रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल. तसेच रेल्वे परिसरातील सुरक्षेला बळकटी मिळण्यास मदत होईल, असे प्रतीक जैन यांनी यावेळी नमूद केले.
या मागणीची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घेतली असून, आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे धरणगाव रेल्वे स्टेशनवर RPF आउट पोस्ट सुरू होण्याच्या मागणीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment