Top News

अनोरे महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन संपन्न

प्रतिनिधी - लक्ष्मण बाविस्कर (महाजन )

अनोरे महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, अनोरे या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन आज आई दुर्गामातेचे पूजन व श्री सत्यनारायण भगवंताच्या पूजनाने धार्मिक व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास धरणगाव हिंगलाज माता पतसंस्थेचे व्यवस्थापक तथा बांभोरी सोसायटीचे चेअरमन मा. दादासाहेब उमेशजी माळी तसेच श्री. संतोषजी सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच संस्थेने भविष्यात सहकार क्षेत्रात अधिक प्रभावीपणे कार्यरत राहून महिला आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबन आणि ग्रामीण आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

अनोरे महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज