Top News

कुस्तीच्या आखाड्यात कल्पेश पाटीलची दमदार कामगिरी; तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक

कुस्तीच्या आखाड्यात भवरखेडे विद्यालयाचा पहेलवान चमकला 

धरणगाव : धरणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत भवरखेडे, विवरे येथील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कल्पेश शांताराम पाटील याने ५१ ते ५५ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या स्पर्धेत तालुक्यातील विविध विद्यालयांमधील कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. कल्पेश पाटील याने आपल्या उत्कृष्ट कुस्ती कौशल्याचे प्रदर्शन करत दमदार कामगिरी केली. त्याच्या या यशामुळे भवरखेडे, विवरे माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.कल्पेशच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉ. शांताराम पाटील, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोनल पाटील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच त्याला मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षक पी. आर ठाकरे यांचेही कौतुक करण्यात आले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय गुणवत्ता आहे. योग्य मार्गदर्शन, सराव आणि प्रोत्साहन मिळाल्यास हे विद्यार्थी तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरावर आपल्या विद्यालयाचे व गावाचे नाव उज्ज्वल करू शकतात, हे कल्पेश पाटीलच्या यशातून अधोरेखित झाले आहे.

कल्पेशच्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज