प्रतिनिधी - श्री सुरज पवार
यवतमाळ : प्रस्तावित वसंत विहार वृद्धाश्रम व साहित्यिक स्व. सुधाकरराव पवार साहित्य संमेलन आयोजन समितीच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना ‘वसंत प्रेरणा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती व संस्थांनी आपले नामांकन पाठवावे, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष सुरज सुधाकरराव पवार यांनी केले आहे.
सुरज सुधाकरराव पवार हे अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असून, ते लेखक, कवी, समाजसेवक, अभिनेते तसेच सनातन सारथी न्यूजचे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या लेखन-संपादनातून साकारलेल्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जीवन व कार्यावर आधारित ‘वसंत गीतांजली’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांच्या कार्याला साहित्यिक अभिवादन करण्यात आले आहे.
विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, कृषी, सांस्कृतिक तसेच इतर क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
या पुरस्कार सोहळ्यास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्यासह प्राचार्य डॉ. संजय प्रभाकर हर्षे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष सुरज सुधाकरराव पवार यांनी दिली.
विविध क्षेत्रांत समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी ‘वसंत प्रेरणा पुरस्कार २०२६’ साठी नामांकन पाठवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment