चंद्रपूर प्रतिनिधी संजय बागडे :- ब्रम्हपुरी शहरातील सुंदरनगर परिसरात दारु पुरवठ्याच्या जुन्या वादातून १८वर्षीय तरुणाला घरातून ओढून मारहाण करण्यात आली.आरोपींनी चाकूने जीवे मारण्याची धमकी दिली असून ब्रम्हपुरी पोलीसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दारू तस्करीच्या ग्राहकावरुन उद्भवलेल्या वादातून १८वर्षीय तरुणाला घरातून रस्त्यावर ओढून बेदम मारहाण केल्याची व चाकूने जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना ब्रम्हपुरी शहरातील सुंदरनगर परिसरात घडली.याप्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, सुंदरनगर येथील ईशांत मोघल डांगे (१८)हा मजुरीचे काम करतो.वडीलाची प्रकृती बरी नसल्याने घरखर्च चालवण्यासाठी तो गडचिरोली जिल्ह्यात दारु पुरवठयाचे काम करत होता.यापुर्वी दारु घरडे यांच्याकडे हेच काम पाहत होता.मात्र,तिन महिन्यांपूर्वी दारु पुरवठयाचे काम पुर्ण बंद केले होते. शुक्रवारी (१८.सप्टे.) रोजी रात्री ११च्या सुमारास ईशांत आपल्या घरी जेवण करीत असताना गुरुदेव नगर येथील दादु प्रकाश घडले(२८), गांधीनगर येथील काशिम शेख(२७), आणि फाशी चौकातील सौरभ आनंद (२२) हे तिघेजण अचानक त्याच्या घरी धडकले."तु गडचिरोली जिल्ह्यात आमच्या ग्राहकांना दारू पुरवठा का करतोस?"असा जाब विचारत तिघांनीही ईशांत सोबत वाद सुरू केला. हा वाद विकोपाला गेल्यावर संशयित आरोपींनी ईशांतला घरातून बाहेर ओढत घरासमोरील सार्वजनिक ओढून रस्त्यावर आणले.तेथे त्याला अश्लील शिवीगाळ करीत "तु जिथे भेटशील तिथे तुला चाकूने मारुन टाकू"अशी जीवे मारण्याची धमकी दिली . आणि दादु घडले याने जबर मारहाण केली.त्याचवेळी परिसरातील नागरिक कुंदन सिंग , प्रेमकुमार सिंग व प्रिन्स सिंग घटनास्थळी जाऊन मध्यस्थी केली . आणि ईशांतला आरोपीच्या तावडीतून सोडविले.या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रचंड भीती निर्माण झाल्याने आणि प्रकृती अस्वास्थ्य ईशांत रात्री जाऊ शकला नाही.दुसऱ्या दिवशी पोलीस ठाणे गाठले व कथन करुन पोलीसात तक्रार नोंदवली.
ईशांत डांगे याच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीसांनी आरोपी दादु प्रकाश घरडे,काशिम शेख आणि सौरभ आनंद यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (बि एन एस),२०२३च्या कलम २९६(अश्लील कृत्य व शिवीगाळ ),११५(२)(दूखापत करणे),३३३(अनाधिकाराने घरात घुसले),३५१(धमकावने),३(५)(समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ठाणे प्रभारी प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पुरुषोत्तम भारडे या प्रकरणाचा तपास करीत आहे.
Post a Comment