यामिनी आरखे व चेतन सोनवणे यांची दमदार कामगिरी
एरंडोल, प्रतिनिधी – तुषार शिंपी : चाळीसगाव येथील तालुका क्रीडा संकुलात २४ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या दोन खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड मिळवली.
डी.डी.एस.पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ज्युनिअर कॉलेज, एरंडोल तसेच रा.ती. काबरे विद्यालय ज्युनिअर कॉलेज यांच्या माध्यमातून खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये यामिनी भानुदास आरखे हिने ५३ किलो वजन गटात, तर चेतन दिलीप सोनवणे याने ७६ किलो वजन गटात दमदार कामगिरी केली. चेतन सोनवणे याने १९ वर्षांखालील शालेय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले.
या दोन्ही खेळाडूंची ३० सप्टेंबर २०२६ रोजी भगूर, जि. नाशिक येथे होणाऱ्या नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशासाठी खेळाडूंना गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष भानुदास आरखे तसेच कुस्ती कोच वस्ताद अनिल मराठे व वस्ताद दिलीप मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. किशोर भाऊ काळकर, आमदार अमोल दादा पाटील (एरंडोल-पारोळा), डी.डी.एस.पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष दादासो. अमित दादा पाटील, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरदकाका काबरे, बालाजी उद्योग समूहाचे संचालक दादासो. संजयजी काबरा, एम.डी. केमिकल्सचे मालक पंकज दादा काबरा, प्रा. मनोज भाऊ पहलवान, जिल्हा युवा सेना अध्यक्ष व नगरसेवक, गटनेता एरंडोल नगरपालिका सुनील भाऊ देशमुख तसेच जिल्हा सचिव, जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघ यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
तसेच गुरु हनुमान कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पंकज पाटील, कार्याध्यक्ष दुर्गादास भाऊ वानखेडे, खजिनदार ऋषिकेश भाऊ महाजन, संचालक अनिल आरखे, अनिल भोई, संजय दादा कुंभार, दिलीप पाटील फौजी, जावेदभाऊ खाटीक, नगराज पवार, पिंटू भाऊ पाटील, अॅड. दीपक पाटील, संभाजी दादा देसले, राजू भाऊ साळी, तात्या ठाकूर, नरेंद्र दादा निकम, भरत दादा पाटील, स्वप्नील बोरसे सर यांच्यासह सर्व आश्रयदाते व सभासदांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment