जळगाव, दि. २८ सप्टेंबर २०२६ : मुख्यमंत्री सहायता निधीसाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे १० लाख रुपयांचा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला.
मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना विविध गंभीर आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. या निधीसाठी देण्यात आलेल्या १० लाख रुपयांच्या धनादेशामुळे गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळण्यास हातभार लागणार आहे.
यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या या योगदानाचे यावेळी स्वागत करण्यात आले.

Post a Comment