तरुणाईची ताकद गावाच्या विकासासाठी आणि समाजकारणासाठी उभी राहिली पाहिजे - पालकमंत्री गुलाबराव पाटील
प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जितू मराठे यांचा पुढाकार
पाळधी / धरणगाव / जळगाव, दि. २७ (प्रतिनिधी) - तरुणाई ही गावाच्या विकासाची खरी ताकद आहे. राजकारणासोबत समाजकारणाची नाळ घट्ट ठेवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पुढे या. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा आणि विकासाचे काम गावागावात पोहोचवा. पक्षात येणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या सामाजिक कार्याला निश्चितच बळ दिले जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव तालुक्यातील साळवा येथील असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी सर्व नवप्रवेशितांच्या गळ्यात भगवा शेला घालून स्वागत केले. युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारणे येथील माजी सरपंच जितू मराठे यांनी या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला.
यावेळी नवप्रवेशित युवकांनी शिवसेनेच्या ध्येयधोरणांनुसार गावातील सामाजिक व विकासाच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच साळवा येथील आणखी युवकांना सामाजिक कार्याच्या प्रवाहात सहभागी करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यांचा झाला प्रवेश प्रवीण रामलाल पाटील, गणेश प्रकाश पाटील, तुषार पुंडलिक पाटील, हिलाल माधव पाटील, डॉ. संजय हिलाल पाटील, महेंद्र वसंत पाटील, परेश नरेंद्र पाटील, वरुण धीरज नारखेडे, दीपक धनराज पाटील, योगेश सुकदेव पाटील, समाधान अशोक पाटील, चंद्रकांत मुरलीधर सोनार व अरुण विक्रम पाटील यांच्यासह असंख्य युवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले तर आभार माजी सरपंच जितू मराठे यांनी मानले
यांची होती उपस्थिती
यावेळी युवानेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, नंदलाल पाटील, उपजिल्हाप्रमुख रवींद्र कापडणे, स्वीय सहायक हेमंत नारखेडे (बंडूदादा), अभिजित पाटील, नवलराजे पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment