प्रतिनिधी नागभीड:- ( संजय बागडे )
आजच्या काळात कार्यक्रम (विविध)आपल्याच शिवार घरात झाले पाहिजे,आपण घरीच थाटामाटात कार्यक्रम करणाऱ्यांची निराळीच संकल्प(ता)असते,मात्र तालुक्यातील ईरव्हा (टेकरी) येथील वर्ग ४मध्ये शिकत असलेल्या मुलाच्या आईने येथील शाळेत केक कापून विद्यार्थी मित्रांच्या सहवासात वाढदिवस साजरा केला. नागभीड तालुक्यातील ईरव्हा/ टेकरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग १ते४पर्यत शाळा आहे.पुढील वर्षी मुलगा दुसऱ्या गावी शिक्षण घेण्यासाठी जाणार असल्याने ( हिमांशू राजू खोंडे) यांचा वाढदिवस आई वैशाली राजू खोंडे यांनी शाळेत साजरा करण्याचा मानस केला.हिमांशू चा केक कापून विद्यार्थी मित्रांच्या सहवासात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका शालीनी पिलारे, अध्यापक माधुरी गिरडे, शाळा समिती अध्यक्ष गिरीधर राऊत, पत्रकार संजय बागडे,सदस्या प्रभा खोंडे, वनमाला देशमुख, किर्तिका आठवले, हिमांशू ची आई वैशाली खोंडे,काकूसह व विद्यार्थी यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा उपस्थितांनी दिली आहे.

Post a Comment