Top News

२८ सप्टेंबरला शासकीय कार्यालयांत ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करा

 


प्रतिनिधी एरंडोल : तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करून जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावेत, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या एरंडोल शाखेने केली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना देण्यात आले.

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ बाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, तसेच नागरिकांना माहितीचा अधिकार सहजपणे वापरता यावा, यासाठी विविध उपक्रम राबविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच, शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागात माहिती अधिकार कायद्याशी संबंधित आवश्यक माहिती, अर्ज प्रक्रिया आणि जनजागृतीपर फलक लावावेत, अशी मागणीही करण्यात आली.

निवेदन देताना तालुकाध्यक्ष सिताराम आनंदा मराठे, संघटक विज्ञान बुधा पाटील, कार्यकारिणी सदस्य राजधर संतोष महाजन आणि तालुका उपाध्यक्ष तुषार सुभाष शिंपी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज