नागभीड तालुका प्रतिनिधी - संजय बागडे
नागभीड तालुक्यात या वर्षी गणेशाच्या आगमनाची जोरात तयारी सुरु आसतांना चोर टोळी सक्रिय झाल्याचे चित्र दिसू लागले आहेत. नागभीड शहरात नियमित गस्त सुरु आहे मात्र चोरांना सुगीचे दिवस आले आहेत. मौशी येथील बनकर कुटुंबीय बाहेरगावी आपल्या मोठ्या मुलीला भेटण्यासाठी ब्रम्हपुरी येथे गेले असता अज्ञात चोरट्यानी 1लाख 15हजार रुपयाचे सोन्याचे दागिने लमपास केले. नागभीड पोलीस स्टेशन गाठून शोभा भीमराव बनकर वय 55हिने चोरीस गेलेले अर्ध्या तोळ्याची दोन गोफ (1लाख 2हजार रुपये ), कानातले दोन जोड ( 52 हजार ), 3ग्रामची नथ ( 15 हजार ) अर्ध्या तोळ्याची अंगठी ( 26 हजार ) अशी फक्त सोन्याची दागिने घेऊन गेले. चांदीचे दागिने तिथेच ठेवले हे विशेष.दुसऱ्या दिवशी लहान मुलगी विजयासोबत घरी परत आल्यावर मुख्य दरवाज्याचा कुलूप तोडला दिसला, आत जाऊन बघितलं असता सामान, कपड्याची फेकाफेक दिसून आल्याने चोरी झाल्याची खात्री झाली बेडरूममधील कपाट पहिले असता वरील वर्णनाचे दागिने गेल्याचे समजले. लगेच नागभीड पोलीस स्टेशनं गाठून चोरीच्या गुन्ह्यांची रिपोर्ट दिली. मात्र चोर शोधण्याचा तपास कुठपर्यंत आला ते समजले नाही...
Post a Comment