Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील युवा पत्रकारांनो, एकत्र या! 'न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन'मध्ये सामील होण्याचे जिल्हा सचिव रोहन कळसकर यांचे जाहीर आवाहन



प्रतिनिधी - संजय बागडे 

चंद्रपूर:पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, आणि या स्तंभाला अधिक मजबूत, निर्भीड आणि गतीमान बनवण्याची ताकद आजच्या तरुण रक्तामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवा पत्रकारांच्या हक्कांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आणि पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यासाठी 'न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन' सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवा पत्रकारांनी या संघटनेशी जोडून घेत संघटित व्हावे, असे खंबीर आवाहन न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हा सचिव रोहन जयंत कळसकर यांनी केले आहे.आज डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या युगात तरुण पत्रकार अतिशय जोमाने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, अनेकदा युवा पत्रकारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणे हाच 'न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन'चा मुख्य उद्देश आहे. याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा सचिव रोहन कळसकर म्हणाले, "चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारितेला एक नवी दिशा देण्याची क्षमता आपल्या युवा पत्रकारांमध्ये आहे. आज गरज आहे ती एकत्र येण्याची आणि संघटित होण्याची. न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन हे केवळ एक संघटन नसून, प्रत्येक पत्रकाराचे हक्क आणि सुरक्षिततेचे कवच आहे. मी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांतील (प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडिया) कार्यरत युवा आणि नवोदित पत्रकारांना आवाहन करतो की, त्यांनी मोठ्या संख्येने या संघटनेत सामील व्हावे. आपण एकत्र येऊन पत्रकारितेचा एक नवा आणि दमदार अध्याय सुरू करूया."

संघटनेचे प्रमुख उद्दिष्टे आणि फायदे:

  • पत्रकारांची सुरक्षा आणि न्याय: कोणत्याही पत्रकारावर अन्याय किंवा दबाव आल्यास संघटन संपूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहणार.
  • कौशल्य विकास: युवा पत्रकारांसाठी कार्यशाळा आणि मार्गदर्शनाचे आयोजन केले जाईल.
  • हक्काचे व्यासपीठ: जिल्हापातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत पत्रकारांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे माध्यम.

चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या युवा पत्रकारांना 'न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन'चे सदस्य व्हायचे आहे, त्यांनी तातडीने जिल्हा कार्यकारिणीशी संपर्क साधून आपले सदस्यत्व निश्चित करावे, असे आव्हान जिल्हा सचिव रोहन कळसकर यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज