Top News

धरणगावात आज रंगणार कुस्तीचा महासंग्राम

हरीयाणा चॅम्पियन मलंग रहेरा ठाकूर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी भारत मदने; ‘खानदेश केसरी’साठी होणार मानाची कुस्ती

धरणगाव, जि. जळगाव : श्री व्यायाम प्रसारक मंडळ, धरणगाव यांच्या वतीने आज मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता मरीमाता मंदिर परिसरात भव्य ‘कुस्ती का महासंग्राम’ आयोजित करण्यात आला आहे. या कुस्ती स्पर्धेमुळे धरणगावात कुस्तीप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले असून, महाराष्ट्रासह परराज्यातील नामांकित मल्लांच्या उपस्थितीने आखाडा गाजणार आहे.

या महासंग्रामातील मुख्य आकर्षण म्हणजे हरीयाणा चॅम्पियन मलंग रहेरा ठाकूर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी भारत मदने यांच्यातील प्रतिष्ठेची कुस्ती. ‘खानदेश केसरी’ या मानाच्या किताबासाठी होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण खानदेशातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

याशिवाय पै. आकाश करे विरुद्ध पै. सैफ अली पंजाबी, पै. मुसा विरुद्ध पै. सुनील जाधव, पै. इमरान विरुद्ध पै. सुनील यांच्यासह अनेक नामांकित मल्लांच्या कुस्त्या रंगणार आहेत. महाराष्ट्र व परराज्यातील मल्ल आपले कुस्ती कौशल्य दाखवणार असल्याने या स्पर्धेला विशेष रंगत येणार आहे.

हा भव्य कुस्ती सोहळा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र कुस्ती फेडरेशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष पै. भानुदास आप्पा विसावे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘धरणगावची शान आमचा आखाडा, आमचा अभिमान धरणगाव’ हे ब्रीदवाक्य घेऊन श्री व्यायाम प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी व संचालक मंडळाने या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे.

कुस्तीप्रेमी नागरिक, तालीम संघांचे पदाधिकारी, खेळाडू व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुस्तीच्या या महासंग्रामाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने मंगलदास भाटिया, प्रशांत वाणी, विलास येवले, कमलेश तिवारी, डॉ. व्ही. आर. तिवारी, डॉ. किशोर भावे, गुलाबराव वाघ, सुरेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, जीवनसिंह बयस, संजय महाजन, दिनकर पाटील, भरत असर, दीपक नगरिया, देविदास महाजन, प्रकाश पाटील, नारायण महाजन, राजू न्हायदे, बाळू येवले, किशोर पैलवान, किशोर वाणी, सुनील चौधरी, शरद भोई, किरण वाणी, गोपाल पाटील, गुरु पैलवान, रावा पैलवान, अरुण महाले, किरण सोनवणे, नंदू करोसिया, आप्पी पैलवान आदींनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज