Top News

श्रावण मासानिमित्त सिद्धी हनुमान मंदिरात भक्तिमय भजनसंध्या

श्रीराम भजनी बहुउद्देशीय मंडळाच्या सुमधुर भजनांनी रंगला आध्यात्मिक सोहळा

धरणगाव : येथील तेली तलाव परिसरातील श्री सिद्धी हनुमान मंदिर संस्थान यांच्या वतीने पवित्र श्रावण मासानिमित्त सोमवारी रात्री भजनाचा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात व आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. श्रावण महिन्यातील पावन पर्वाचे औचित्य साधून भगवान भोलेनाथांच्या चरणी भक्तिभाव अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी गुरव गल्ली येथील श्रीराम भजनी बहुउद्देशीय मंडळ, धरणगाव यांनी सहभाग नोंदवत सुमधुर व अध्यात्मिक भक्तिगीते, भगवान महादेवांची भावस्पर्शी गीते तसेच गवळण सादर करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भक्तिमय वातावरणामुळे उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळाली.

या कार्यक्रमास गोपाल वराडे, योगराज बडगुजर, गणेश महाजन, ईश्वरी लाल महाराज, शशिकांत गुरव, पंकज धनगर, युवराज धनगर, संजय गुरव, बाळू वराडे, भगवान ठाकरे, महेश राजपूत, नामदेव महाराज, संदीप न्हावी, सिद्धार्थ वाघरे यांच्यासह श्री सिद्धी हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भटुलाल महाजन, निंबा ठाकरे, संजय चौधरी, चुडामण चौधरी, नगरसेवक सुनील चौधरी, नगरसेवक भागवत चौधरी, ईश्वर सोनार, भागवताचार्य ह.भ.प. मेघनाथ महाराज ठाकरे, गुलाब महाजन, सागर ठाकरे, किशोर महाजन, शामराव महाजन,आबा चौधरी, यश ठाकरे तसेच परिसरातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रावण मासातील भक्ती, नामस्मरण आणि आध्यात्मिक साधनेचा जागर घडवून आणणारा हा भजन सोहळा भाविकांच्या मनावर भक्तीचा अमीट ठसा उमटवून गेला. मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक करण्यात आले.


Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज