Top News

शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या पुढाकाराणे मार्कंडा येते महाअभिषेक सोहळा संपन्न

 

शेतकरी, युवक, महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

प्रतिनिधी - संजय बागडे 

गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहनाचा मुद्दा, शेतीमालाला योग्य भाव, खतांचा प्रश्न, सिंचन, रस्ते, रोजगार, आरोग्य, महिलांच्या सुरक्षिततेसह जिल्ह्यातील अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. या प्रश्नांची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निराकरण करावे, यासाठी शेतकरी संघर्ष कृती समिती, गडचिरोली च्या वतीने श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे भव्य महाअभिषेक सोहळा संपन्न झाला.

विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी श्री मार्कंडेश्वर महादेवाचा महाअभिषेक करण्यात आला असून या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, युवक, महिला आणि नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लागाव्यात, शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी, यासाठी श्री मार्कंडेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष किसान काँग्रेस पराग पास्ते साहेब, वानखेडे सर अमरावती, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस नेते ऍड. दुष्यंत नामदेव किरसान,नगरसेवक सतीश विधाते, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, तालुकाध्यक्ष गडचिरोली वसंत राऊत, तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सलोटकर, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर,दिवाकर निसार, उत्तम ठाकरे, विजय लाड, सौं.कविताताई भगत, तात्याजी चीचघरे, विजयानंद महाराज रोडे, नदीम नाथानी,हरबाजी मोरे, गौरव येनप्रेड्डीवार, श्रीनिवास ताडपल्लीवार, राज बोदलकर, विलास चीजघरे, स्वप्निल बेहेरे, विजय राऊत, सह पदाधिकारी,काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर,युवक व महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

 शेती वाचवा जिल्हा वाचवा..

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज