Top News

महागाव येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणाली ससाने यांच्या हस्ते ध्वजारोहण; विद्यार्थी, पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

प्रतिनिधी -श्री सुरज पवार 

महागाव / यवतमाळ, दि. १५ ऑगस्ट : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा महागाव येथे ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्रणाली ससाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाला महागाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तुळशीदास चव्हाण, गटशिक्षण अधिकारी संजय कांबळे, सहाय्यक गट विकास अधिकारी महेंद्रराव जाधव, लेखक, कवी, समाजसेवक, पत्रकार व अभिनेते सूरज सुधाकरराव पवार यांच्यासह केंद्रप्रमुख प्रविण देवसकर तसेच शिक्षक, पालक प्रतिनिधी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण 

कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक प्रल्हाद राठोड यांनी केले. मनस्विनी होनाळे यांनी प्रास्ताविक केले, तर शितल शेट्टे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने व देशभक्तीपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण शाळा परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळाला.

 मान्यवरांचा सत्कार..

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज