Top News

ब्रम्हपुरी योग समितीतर्फे उत्साहात झेंडावंदन

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण; भागवत सर यांच्या निवासस्थानी देशभक्तीमय वातावरणात कार्यक्रम संपन्न

ब्रम्हपुरी : भारताच्या स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ब्रम्हपुरी योग समितीतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. समितीचे अस्थायी कार्यालय असलेल्या भागवत सर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात राजू भागवत सर यांनी प्रस्तावना करून केली. त्यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक व थोर राष्ट्रपुरुषांचे स्मरण केले.

यानंतर श्री. दिलीप जुमडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. तरल नागमोती यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी श्री. प्रकाश धोरूडे सर, श्री. गजाननराव बुरले, श्री. रत्नाकर ढोरे सर व श्री. जुमडे सर यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास श्री. श्रावणजी ढोरे, डॉ. विजय खंडाते, डॉ. गिरीश शेंडे, श्री. भाऊराव बांगरे, श्री. एकनाथ दोनाडकर, श्री. खुशाल उमक, श्री. नाकतोडे सर, श्री. अनिल मुडे सर, श्री. सोमेश्वर राऊत, श्री. शंकरराव देशमुख सर, सौ. पाटणकर मॅडम, सौ. कीर्ती झाडे मॅडम, सौ. रश्मी राऊत, सुरेश काळबांधे, उद्धव कुथे, पूनम चौधरी व रागिणी कुथे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. घनश्यामजी कावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज