![]() |
| धानोरेत भक्तिमय वातावरणात सप्ताहाची सांगता; काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन |
धानोरे प्रतिनिधी : लक्ष्मण महाजन (बाविस्कर)
धानोरे येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही कुलदैवत श्री पांडुरंगाच्या कृपेने व साधुसंतांच्या आशीर्वादाने श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. समस्त ग्रामस्थ मंडळी धानोरे यांच्या वतीने श्री संत सावता माळी मंदिर हॉल येथे या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
वै. ह.भ.प. मोठे बाबा, नथूसिंग बाबा, वै. ह.भ.प. सुपडू बाबा आणोरेकर व ह.भ.प. रामदास बाबा वरसाडेकर यांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री महामंडलेश्वर श्री श्री १००८ ह.भ.प. गुरुवर्य भगवानदासजी बाबा धरणगावकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सप्ताह पार पडला.
सप्ताहादरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ काकड आरती, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ आणि रात्री ८ ते १०.३० या वेळेत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन व हरिनामाचा लाभ घेतला.
या सप्ताहात ह.भ.प. श्री सावता महाराज मोहाडीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, ह.भ.प. कुणाल महाराज खडकदेवळा, ह.भ.प. जीवराम महाराज सूर्यवंशी कापडणेकर, ह.भ.प. यशवंत महाराज कमळगावकर, ह.भ.प. विकास महाराज मोरदडकर, महंत श्री अशोकदास महाराज शिरपूरकर तसेच ह.भ.प. श्री राजेंद्र महाराज केकत निंभोरा यांनी कीर्तनसेवा केली.
कीर्तनसेवेला माऊली वारकरी शिक्षण संस्था, धरणगावचे अध्यक्ष महामंडलेश्वर श्री श्री १००८ गुरुवर्य ह.भ.प. श्री भगवानदास बाबा, महंत श्री बाबूलालदासजी महाराज तरडेकर, संस्थेतील विद्यार्थी बाळगोपाळ तसेच गायनाचार्य ह.भ.प. श्री रोहिदास महाराज निंभोरेकर, ह.भ.प. श्री भागवत महाराज वाकटुकीकर, ह.भ.प. श्री समाधान महाराज धानोरेकर, मृदुंगाचार्य ह.भ.प. श्री विठोबा महाराज धानोरेकर व विणेकरी ह.भ.प. श्री तुळशीराम महाराज धानोरेकर यांनी साथ दिली. तसेच आणोरे, धानोरे, गारखेडा व पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला.
सप्ताहादरम्यान श्री संत शिरोमणी सावता महाराज व श्री पांडुरंग महाराज यांच्या प्रतिमांची पालखी मिरवणूक गावातून काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
सप्ताहाच्या समारोपप्रसंगी मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी ह.भ.प. श्री राजेंद्र महाराज केकत निंभोरा यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रतापराव गुलाबराव पाटील, सरपंच सौ. गायत्रीबाई भगवान पाटील, माजी सरपंच श्री. भगवान आसाराम पाटील, पोलीस पाटील श्री. सुरेश गंगाराम पाटील, श्री. मोहन पाटील सर, धरणगावच्या नगरसेविका सौ. हेमांगीताई किरण अग्निहोत्री, सामाजिक कार्यकर्ते श्री. लक्ष्मण पाटील सर, श्री. मोहित पाटील, बांभोरी येथील श्री. लीलाधरभाऊ पाटील, गारखेडा येथील श्री. जिजाबराव पाटील यांच्यासह आणोरे, धानोरे, गारखेडा व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संयोजक व आयोजक :सर्व ग्रामस्थ मंडळी, धानोरे





Post a Comment