Top News

जीपीएस मित्रपरिवाराच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ८७ ज्येष्ठ नागरिकांवर यशस्वी शस्त्रक्रिया.

जीपीएस मित्रपरिवाराच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ८७ ज्येष्ठ नागरिकांवर यशस्वी शस्त्रक्रिया.

धरणगाव, दि. १४ ऑगस्ट २०२६ : जीपीएस मित्रपरिवार व आर. आर. झुंझुनवाला शंकरा हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने धरणगाव येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन श्रीकांत शिंदे फाउंडेशन येथे करण्यात आले. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरासाठी सुमारे ४०० ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८७ रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर १०७ ज्येष्ठ नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

जीपीएस परिवारातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून गरजू नागरिकांसाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ८ ते १० हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया तसेच चष्म्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या शिबिराला महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शिबिरातील ज्येष्ठ महिला-पुरुष नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच शिबिराच्या व्यवस्थेची माहिती घेतली.

दि. १५ ऑगस्ट रोजी पाळधीत शिबिराचे आयोजन

जीपीएस मित्रपरिवाराच्या वतीने दि. १५ ऑगस्ट रोजी पाळधी येथेही मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव जिल्हा शिवसेना परिवारातर्फे करण्यात आले आहे.

यावेळी जळगाव जिल्हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर, श्री व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भानुदासजी विसावे, धरणगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विजय महाजन, शिवसेना नेते पप्पू भाऊ भावे, शहरप्रमुख धीरेंद्र आप्पा, नगरपालिका गटनेते विलास भाऊ महाजन, धरणगाव नगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक, युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज