Top News

महात्मा फुले हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिन व बक्षिस वितरण समारोह संपन्न !

गुणवंत विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हावे व शाळेचे नाव मोठे करावे - ज्ञानेश्वर महाजन ( संस्थाध्यक्ष )

धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व बक्षिस वितरण समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम आलेला विद्यार्थी वैभव राकेश माळी याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समारोहाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन होते. प्रमुख अतिथी संचालक मोतीलाल महाजन, गोपाल महाजन, माजी मुख्याध्यापक एस डब्ल्यू पाटील, पत्रकार धर्मराज मोरे, ह भ प हिरालाल महाराज, सिताराम महाजन, केदार मॅडम, शुभम महाजन, १९९९ बॅच चे माजी विद्यार्थी रेखा पाटील, नितेश माळी, नरेंद्र बडगुजर, गुलाब महाजन, विजय महाजन, दीपक वाघ, सुजित वाघरे, विकास मोरावकर, बालू भोई, किशोर चौधरी, विनोद महाजन, विठ्ठल अहिरे, धनराज जाधव, किशोर पारधी, दिशा ढोबळे, रवींद्र पाटील, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, माता-पालक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          सर्वप्रथम तंबाखूमुक्तीची सार्वजनिक शपथ घेतली. यानंतर क्रीडा शिक्षक एच डी माळी यांच्या मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थ्यांनी कवायत संचलन केले. मान्यवरांच्या हस्ते वर्ग १ ली ते वर्ग ९ वी व एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत तसेच मागासवर्गीयातून प्रथम, द्वितीय, तृतीय अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे, शालेय शैक्षणिक साहित्य, कपडे, महापुरुषांचे अनमोल ग्रंथाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी विश्वस्त मोतीलाल महाजन, दिपक वाघ, नरेंद्र बडगुजर यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील विविध उपक्रमशील उपक्रमांचे कौतुक केले.

            शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील व एम बी मोरे यांना नगरपालिकेकडून "उत्कृष्ट बी एल ओ पुरस्कार " मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिनेश शेठ लोहार यांच्याकडून चॉकलेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी, पी डी पाटील तर आभार व्ही टी माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज