Top News

स्वातंत्र्य दिनी पी डी पाटील व एम बी मोरे यांना उत्कृष्ट बी एल ओ पुरस्कार !....

शहरात एस आय आर चे प्रथम क्रमांकांने काम पूर्ण करणारे BLO पी डी पाटील : रोशन राजपुत ( मुख्याधिकारी ) 

पुरस्काराने काम करण्यास ऊर्जा मिळते : पी डी पाटील

धरणगाव - नगर परिषद धरणगाव येथे ८० वा. भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय स्मारकासमोर तिरंगा चौकात धरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रोशनसिंग राजपुत यांनी पुजन केले व नगराध्यक्षा लीलाबाई सुरेश चौधरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सर्वप्रथम राष्ट्रगीत, वंदे मातरम , महाराष्ट्र गीताचे सामुहिक गायन झाले.

           धरणगाव शहरातील ६ बी एल ओ यांना उत्कृष्ट BLO पुरस्कार देण्यात आला. यामध्ये धरणगाव शहरातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे उपशिक्षक तथा यादी भाग क्रमांक १९९ चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पी डी पाटील व यादी भाग क्रमांक १९५ चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी एम बी मोरे यांना नगराध्यक्षा लिलाबाई चौधरी व मुख्याधिकारी रोशन राजपूत यांच्या शुभहस्ते "उत्कृष्ट BLO पुरस्कार " देऊन सन्मानित करण्यात आले.

           पी डी पाटील यांनी धरणगाव मोठा माळीवाडा परिसरातील भारत निवडणूक आयोगा अंतर्गत एस आय आर मतदार पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये धरणगाव शहरात वेळेच्या आधी एस आय आर चे शहरात प्रथम क्रमांकाने पुर्ण केले. मतदार यादी अद्यावत ठेवणे, फॉर्म नंबर सहा, सात, आठ वेळोवेळी भरणे. वर्षभरामध्ये मतदार जनजागृती करणे या कार्याची दखल घेऊन नगरपरिषदेने प्रथमच पी डी पाटील यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी देखील पी डी पाटील यांना तीन वेळा तहसील कार्यालय धरणगाव यांच्या माध्यमातून तहसिलदार नितीनकुमार देवरे, तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते आदर्श बी एल ओ पुरस्कार मिळालेला होता. नगरपरिषदेने आमच्या कार्याची दखल घेत आम्हाला पुरस्कार देऊन सन्मानित केले.पाटील यांनी नगरपरिषदेचे आभार मानत पुरस्काराने ऊर्जा मिळते असे प्रतिपादन केले.

              याप्रसंगी मुख्याधिकारी रोशन राजपूत, नगराध्यक्षा लिलाबाई सुरेश चौधरी, उपनगराध्यक्ष सुरेखा विजय महाजन, भिकन पवार, सांस्कृतिक क्रीडा समितीचे सभापती प्रियंका चेतन जाधव, सर्व नगरसेवक बंधू - भगिनी, पत्रकार कडू महाजन, धर्मराज मोरे, तसेच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य क्षेत्रातील मान्यवर तसेच नगरपरिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी वृंद व धरणगाववासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज