![]() |
| रक्षाबंधनाच्या औचित्याने टाकाऊ वस्तूंपासून ५० विद्यार्थ्यांनी साकारल्या मनमोहक राख्या; कल्पकता, नवनिर्मिती व कृती कौशल्याला मिळाला वाव. |
जळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी शासन निर्देशित ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या तयार करण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये विकसित व्हावीत, विविध सण-उत्सवांच्या माध्यमातून संस्कृतीची जोपासना व्हावी, तसेच कृती कौशल्य, नवनिर्मिती आणि देशप्रेम यांसारखे गुण विकसित व्हावेत, या उद्देशाने रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. 
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या 
राख्या तयार करताना विद्यार्थी व मार्गदर्शन करताना शिक्षक
या उपक्रमात शाळेतील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत घरातील टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून मनमोहक राख्या तयार केल्या. तांदूळ, डाळ, पिस्त्याच्या साली, कागद, रंगीत दोरे, स्पंज, लोकर, रंगीत फुले, टिकली, मणी, कुंदन लेस आदी साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या आकर्षक राख्या साकारल्या.
या उपक्रमासाठी शिक्षिका सौ. नीलिमा सपकाळे, सौ. सुवर्णा वंजारी, सौ. मंगला भारुळे, श्रीमती योगिता महाजन, सौ. रुपाली महाजन, सौ. योगिता तडवी, सौ. वृषाली पाटील, श्रीमती संपदा तुंबळे, सौ. जयश्री नेहेते तसेच शिक्षक श्री. हिम्मत काळे, श्री. आनंद पाटील, श्री. उमेश ढाकणे, श्री. जावेद पटेल व श्री. बापू पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षक सौ. रमा तारे, श्री. जगदीश साळुंखे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Post a Comment