Top News

विज्ञाननाट्याच्या प्रभावी सादरीकरणातून साळवे विद्यालयाची दमदार कामगिरी!

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला

धरणगाव प्रतिनिधी / पंचायत समिती शिक्षण विभाग व महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले यांच्या मार्गदर्शनाने तालुकास्तरीय विज्ञान मेळावा 2026 -27 आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत साळवे इंग्रजी विद्यालय, साळवे येथील विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता - संधी आणि धोके या विषयावर आपल्या प्रभावी अभिनयातून व वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणाऱ्या सादरीकरणातून द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. 

स्पर्धेत तालुक्यातील सात शाळांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी आर जी सैंदाणे होते. विज्ञान मंडळाचे तालुका समन्वयक नवनीत सपकाळे, परीक्षक एस पी तायडे, समाधान कोळी व श्याम सपकाळे यांनी काम पाहिले.

विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि दैनंदिन जीवनातील वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा सुंदर मेळ घालत नाट्य सादर केले. ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे आणि तोटे सादरीकरणातून स्पष्ट केले. प्रभावी संवादफेक, उत्कृष्ट अभिनय, नेटक्या रंगमंचीय हालचाली तसेच वैज्ञानिक विषयाची प्रभावी मांडणी यामुळे त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली.




या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. शशिकांत नारखेडे, कोषाध्यक्ष डॉ. चंद्रकांत नारखेडे, मुख्याध्यापक एस. डी. मोरे तसेच शिक्षकवृंद यांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे साळवे इंग्रजी विद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज