अमरावती : युवा कर्तृत्व फाउंडेशन महाराष्ट्र, मानव चेतना जनविकास बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूर व शुभम क्लासेस अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लक्षवेध कर्तृत्व गौरव संमेलन अमरावती २०२६’ हा पुरस्कार सोहळा दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी संत गाडगेबाबा समाधी मंदिर सभागृह, गाडगे नगर, शिवाजीनगर, अमरावती येथे उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यात सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक, कवी, समाजसेवक व अभिनेते तसेच ‘सनातन सारथी न्यूज’चे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी सुरज सुधाकरराव पवार यांना पत्रकारिता, समाजसेवा, साहित्यनिर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘लक्षवेध कर्तृत्व गौरव राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘वसंत गीतांजली’ या काव्यसंग्रहाचे संपादन सुरज पवार यांनी केले आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले आहे. त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते सुरज पवार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. बी. एन. खरात, संचालक विसावा आश्रम, अभिनेत्री राजश्री कोळी आणि अभिनेत्री ईशा भिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सुरज सुधाकरराव पवार हे मूळचे मुक्काम पोस्ट सेलू, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ येथील असून सध्या महागाव, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथे वास्तव्यास आहेत. पत्रकारिता, सामाजिक कार्य, साहित्य आणि अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल पत्रकार सुरज पवार यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.


Post a Comment