![]() |
| सायकल वाटप, वृक्षारोपण व व्यसनमुक्तीची शपथ; विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायतीतून जागविला देशभक्तीचा उत्साह |
यवतमाळ प्रतिनिधी : वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वडगाव रोड, यवतमाळ येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य प्रशांत जिन्नेवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात माजी प्राचार्य भीमराव गुरुदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनी खुशी गणेश बोंद्रे व मोहिनी विजय राठोड यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात आंब्याच्या रोपांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
वृक्षारोपण करताना 
सायकल वितरण
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व झेंडा गीत सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायतही सादर केली.
कार्यक्रमाला गजानन मोकलकर, कुसुमताई अंबाडरे, माजी विद्यार्थी व व्यावसायिक रोशन ससनकर, ज्येष्ठ शिक्षक कुयटे सर, विवेक ढेरे, राजू ढवक, विजय राठोड, अनिकेत राठोड, अमोल राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोहम्मद सईद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिकेत राठोड व भारत भाऊ कांबळे यांनी परिश्रम घेतले. शेवटी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
![]() |
| प्रतिनिधी श्री. सुरज पवार (महाराष्ट्र राज्य) |


Post a Comment