![]() |
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान |
धरणगाव प्रतिनिधी : शिवशक्ती वाहतूक सेनेच्या धरणगाव तालुक्यातील विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यामध्ये पाळधी बु. शहर प्रमुखपदी तुषार शिवाजी मोरे, पाळधी खु. शहर प्रमुखपदी रवी शांताराम कोळी, तर उपतालुका प्रमुखपदी गजानन नाना ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली.
वाहतूक व्यवस्था ही देशाच्या विकासाचा महत्त्वाचा कणा आहे. रस्ते, रेल्वे, जलमार्ग आणि हवाई मार्गामुळे दळणवळण सुलभ होऊन व्यापार, उद्योग आणि मानवी जीवनाला गती मिळते. मात्र, वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण ही सध्याची मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे सुरक्षित, नियमबद्ध आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.
यावेळी शिवशक्ती वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष समाधान वाघ यांच्यासह आबा माळी, प्रशांत झंवर, अनिल माळी, भूषण माळी, कल्पेश कोळी, भैय्या सोनार आणि सोपान कोळी उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे धरणगाव तालुक्यात वाहतूक क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर संघटितपणे काम करण्यास बळ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment