Top News

कोसदणी घाटात महामार्गावर दगड-धोंडे कोसळण्याचा धोका; संरक्षण भिंतीची मागणी.


आर्णी तालुक्यातील कोसदणी घाटातील परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; अपघाताची शक्यता

आर्णी : नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील आर्णी तालुक्यातील कोसदणी घाटात डोंगरावरील दगड-धोंडे महामार्गावर पडत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अचानक रस्त्यावर दगड आल्यास वाहनचालकांचा ताबा सुटून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या धोकादायक परिस्थितीकडे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. विशेषतः घाटातील धोकादायक भागात संरक्षण भिंत उभारण्यात यावी, तसेच डोंगरावरील सैल दगड-धोंडे हटवून रस्त्याची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी ‘सनातन सारथी न्यूज’चे प्रतिनिधी सुरज सुधाकरराव पवार यांनी केली आहे.

महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

— प्रतिनिधी : सुरज सुधाकरराव पवार
सनातन सारथी न्यूज, महाराष्ट्र राज्य
मो. 7350236121
मुलाखत, जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज