![]() |
पुसद मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या मोहिनी ताई नाईक यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा |
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा. इंद्रनील मनोहरराव नाईक यांच्या पत्नी, पुसद नगरपरिषदेच्या अध्यक्ष तथा वसंत प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ. मोहिनी ताई नाईक या उच्चविद्याविभूषित वकील असून, समाजकारण आणि जनसेवेचा समृद्ध वारसा त्या सक्षमपणे पुढे नेत आहेत.
पुसद मतदारसंघाला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी ऐतिहासिक ओळख लाभली आहे. हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्याचप्रमाणे स्व. बाबासाहेब नाईक, मनोहरराव नाईक, अविनाश नाईक यांचा समाजसेवेचा वारसा आज नामदार इंद्रनील भाऊ नाईक आणि मोहिनी ताई नाईक यांच्या माध्यमातून पुढे सुरू आहे.
नाईक बंगला, पुसद येथे दर शनिवारी जनता दरबार भरवून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा उपक्रम सुरू आहे. जनतेच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत, प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने, प्रेमाने आणि सौजन्याने संवाद साधण्याची भूमिका मोहिनी ताई नाईक यांची दिसून येते. नामदार इंद्रनील नाईक यांच्या जनसेवेच्या कार्याला त्यांची भक्कम साथ लाभत आहे.
जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि शक्य त्या पातळीवर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, या कार्यामुळे इंद्रनील भाऊ नाईक आणि मोहिनी ताई नाईक यांच्याविषयी पुसद मतदारसंघासह यवतमाळ जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.
पुसद मतदारसंघाच्या विकासाबरोबरच यवतमाळ जिल्ह्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न नाईक कुटुंब पाहत असून, त्या दिशेने समाजकारण आणि जनसेवेची वाटचाल सुरू आहे. नाईक घराण्याचा समाजसेवेचा हा गौरवशाली वारसा आगामी काळातही असाच अविरत सुरू राहो, हीच अपेक्षा.
सौ. मोहिनी ताई नाईक यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेचे कार्य करण्यासाठी सदैव ऊर्जा लाभो. तसेच त्यांना भविष्यात महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळावी, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या हातून जनतेची आणि समाजाची अशीच उल्लेखनीय सेवा घडत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
— लेखक : सुरज सुधाकरराव पवार
संपादक – वसंत गीतांजली काव्यसंग्रह
पत्रकार | कवी | अभिनेते | समाजसेवक
प्रतिनिधी – सनातन सारथी न्यूज, महाराष्ट्र राज्य
अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त


Post a Comment