Top News

प्रथम चाचणी परीक्षेत रितूजा उघडे प्रथम; कल्पतरू अकॅडमीतर्फे गौरव

पुसद : वसंतपूर-खर्डा, ता. दिग्रस, जि. यवतमाळ येथील रहिवासी संदीप देवराव उघडे यांची कन्या कु. रितूजा संदीप उघडे हिने पुसद येथील कल्पतरू अकॅडमी, नाईक चौक येथे झालेल्या प्रथम चाचणी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

रितूजाच्या या यशाबद्दल कल्पतरू अकॅडमीचे मुख्याध्यापक कांगाने सर यांच्या हस्ते तिचा मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी तिच्या यशाचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कु. रितूजा उघडे हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच शिक्षकवर्गाला दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे हे यश मिळाल्याचे तिने सांगितले.

रितूजाच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रतिनिधी : सुरज सुधाकरराव पवार
सनातन सारथी न्यूज, महाराष्ट्र राज्य

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज