Top News

सनातन सारथी न्यूजचे प्रतिनिधी सुरज पवार यांनी घेतली प्रा. उदय नावलेकर यांची विशेष मुलाखत.



सहा पुस्तकांचे लेखक, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार विजेते आणि समाजसेवेत सक्रिय असलेल्या प्रा. उदय नावलेकर यांनी उलगडला आपल्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास

यवतमाळ | प्रतिनिधी : सुरज सुधाकरराव पवार

पारवेकर महाविद्यालय, यवतमाळ येथील प्राचार्य तथा साहित्यिक प्रा. उदय नावलेकर यांची सनातन सारथी न्यूजचे प्रतिनिधी सुरज सुधाकरराव पवार यांनी विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत प्रा. नावलेकर यांनी आपल्या शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.

प्रा. नावलेकर यांनी आतापर्यंत सहा पुस्तकांचे लेखन केले असून त्यापैकी पाच पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. त्यांच्या साहित्यकृतींना वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबरोबरच त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.

भारतरत्न स्वर्गीय गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या जीवन आणि संगीत प्रवासावर आधारित माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी फिल्म त्यांनी तयार केली आहे. या कार्याचे विविध स्तरांवर कौतुक होत आहे.

प्रा. नावलेकर यांना त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला असून विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच रोटरी क्लबच्या पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे.

सध्या ते यवतमाळ येथील रुईकर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

 समाजाभिमुख दृष्टिकोन, साहित्य निर्मिती आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे प्रा. उदय नावलेकर हे अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

मुलाखतीदरम्यान प्रा. नावलेकर यांनी युवकांनी शिक्षणासोबत सामाजिक जाणीव आणि संस्कार जोपासण्याचे आवाहन केले. त्यांच्या बहुआयामी कार्याची माहिती जाणून घेण्याची संधी सनातन सारथी न्यूजच्या माध्यमातून वाचकांना मिळाली. 

🟦 सविस्तर मुलाखत बघा. 👇

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज