Top News

शिक्षक मतदार संघात मोठी घडामोड: पोहरादेवीचे महंत प्राचार्य सुनील महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

 


बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी राजकीय आखाड्यात प्रवेश; शिक्षक बांधवांना उपस्थितीचे आवाहन

यवतमाळ/अमरावती (प्रतिनिधी) दि. ५ ऑक्टोबर २०२६ - अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत एक मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेल्या पोहरादेवी संस्थानचे महंत तथा प्राचार्य सुनील महाराज आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ठीक १:०० वाजता अमरावती येथे ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त शिक्षक बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सुनील महाराज हे केवळ धार्मिक नेते नसून शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू प्राचार्य म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे चित्र बदलणार असून, बंजारा समाजासह सर्वच शिक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

  •  स्थळ: अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय
  •  वेळ: आज दुपारी १:०० वाजता

प्रतिनिधी : सुरज सुधाकरराव पवार - 7350236121



Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज