( दि. १० ते १ १ ऑक्टोंबरला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव)
ब्रह्मपुरी/प्रतिनिधी संजय बागडे ;- दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दि. ११ ऑक्टोंबर २०२६ रोजी रविवारला श्री गुरुदेव सेवा मंडळ रणमोचन (नवीन वस्ती) यांच्या सौजन्याने रात्रो ८:०० वाजता भव्य विदर्भस्तरीय खुली खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन श्री. गुरुदेव सेवा मंडळ रणमोचन येथे करण्यात आले आहे.
या खंजिरी भजन स्पर्धेसाठी पहिले बक्षीस (पुरुष गट) १५ ,००१ दुसरे बक्षीस ११,००१ तिसरे बक्षीस ७००१ चवथे बक्षीस ५००१ पाचवे ३००१ बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर महिला गटासाठी पहिले बक्षीस ९,००१ दुसरे बक्षीस ५,००१ तिसरे
बक्षीस ३,००१ चौथे २००१ ,पाचवे बक्षीस १००१ ठेवण्यात आले आहे. भव्य विदर्भस्तरीय खुली खंजरी भजन स्पर्धेला उद्घाटन ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या शुभ हस्ते होणार आहे. व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त भजन मंडळींनी या स्पर्धेत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ रणमोचन (नवीन वस्ती)यांनी केले आहे.

Post a Comment