Top News

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान; पथनाट्यातून दिला स्वच्छतेचा संदेश


धरणगाव : श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व वृक्षारोपण

कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील, मुख्याध्यापक एस. एस. पाटील व पर्यवेक्षक डी. आर. चव्हाण यांच्या हस्ते भारतमाता, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानिमित्त शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.


शहरात विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम

स्वच्छ भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी धरणगाव शहरातील बाजारपेठ परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, बसस्थानक, नगरपालिका परिसर तसेच विविध चौकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवत स्वच्छतेबाबत जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. 


यावेळी सांस्कृतिक समितीतील ज्येष्ठ सदस्य ए. एच. पाटील यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती प्रमुख सागर पाटील, के. के. चव्हाण, एस. एस. देसले, पी. एस. गजरे, जे. एस. बोरसे, व्ही. एल. मोरे व पी. पी. रोकडे तसेच स्वच्छता समिती प्रमुख के. एम. माळी, डी. एन. चौधरी, आर. पी. पवार, एन. बी. ठाकरे, पी. व्ही. पाटील, एस. व्ही. तारे, एस. एस. देसले, शितल वानखेडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज