Top News

खेळातून खिलाडूवृत्ती, शिस्त व संघभावना निर्माण होते : शिक्षक नेते सी.के. पाटील

इंदिरा गांधी विद्यालयात तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

धरणगाव शहरातील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. वयोगट १४, १७ व १९ वर्षांखालील या स्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाचे सचिव तथा शिक्षक संघटनेचे नेते सी.के. पाटील यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास प्राचार्या सुरेखा पाटील, संस्थेचे संचालक आशिषकुमार पाटील, उपमुख्याध्यापक ए.एस. पाटील, पर्यवेक्षिका भारती पाटील, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इंदिरा गांधी विद्यालय व तालुका क्रीडा समन्वय समितीच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना सी.के. पाटील म्हणाले, “खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण होते. व्हॉलीबॉल हा सुंदर सांघिक खेळ असून, त्यातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना व आत्मविश्वास वाढतो.” त्यांनी सहभागी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांनी केले. यावेळी क्रीडा शिक्षक डी.एन. पाटील, ललित ढोके, प्रा. जितेंद्र ओस्तवाल, एस.पी. सोनार, पी.डी. पाटील, चेतन पाटील, ज्ञानेश्वर घुले, कौशल पाटील, आशिष पाटील, फिलिप्स गावित तसेच पंच क्षितिज सोनवणे, सागर मोरे, निलेश पाटील, आकाश बिवाल, विनय पाटील यांच्यासह क्रीडा शिक्षक, संघ व्यवस्थापक व खेळाडू उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी. पाटील यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्वांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज