Top News

गोपाळ भटक्या समाजाच्या संघर्षाला यश: चौगान येथे ऐतिहासिक जातीचे प्रमाणपत्र वाटप सोहळा संपन्न!

 


अ‍ॅड. गणेशजी राऊत व माजी सरपंच उमेशजी धोटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण; भविष्यातील संघर्षात खंबीरपणे पाठीशी राहण्याची ग्वाही  

​सामाजिक कार्यकर्ते कृपाकर चहांदे यांच्या चिकाटीच्या कामाचे कौतुक; 

​ब्रह्मपुरी (विशेष प्रतिनिधी): संजय बागडे 

वर्षानुवर्षांपासून उपेक्षित आणि शासकीय ओळखीपासून वंचित असलेल्या गोपाळ भटक्या समाजातील कुटुंबांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. चौगान येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्हिडिओ वॉलिंटिअर्स प्रतिनिधी कृपाकर चहांदे यांच्या कार्यालयात पार पडलेल्या विशेष सोहळ्यात गर्वला व चिचगाव डोर्ली येथील गोपाळ समाजातील बांधवांना अधिकृत 'जातीचे प्रमाणपत्र' (Caste Certificate) वाटप करण्यात आले.  

​उपविभागीय अधिकारी (SDM) पर्वनी पाटील मॅडम व तहसील कार्यालयाचे विशेष सहकार्य आणि कृपाकर चहांदे सामाजिक कार्यकर्ते ‌यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे हा हक्क साध्य झाला आहे.

​मान्यवरांचे मार्गदर्शन व खंबीर पाठिंबा:

​कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले अ‍ॅडव्होकेट गणेशजी राऊत आणि माजी सरपंच उमेशजी धोटे यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना दाखल्यांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना उमेशजी धोटे व अ‍ॅड. राऊत साहेब म्हणाले की, "भविष्यात तुमच्या हक्क आणि अधिकारांसाठी निर्माण होणाऱ्या कोणत्याही समस्येत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू." असा धीर त्यांनी उपस्थितांना दिला. तसेच तळागाळातील या घटकांसाठी कृपाकर चहांदे करत असलेल्या प्रामाणिक कामाचा आणि संघर्षाचा गौरव करत त्यांनी कृपाकर यांच्या कामाचे मनःपूर्वक कौतुक केले.  

​उत्साही उपस्थिती व विशेष सहकार्य:

​या सोहळ्याला गर्वला आणि चिचगाव डोर्ली येथील गोपाळ भटक्या समाजातील महिला, पुरुष व बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद व्यक्त केला. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शीला चहांदे आणि संकल्प चहांदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  

​"हा केवळ कागदाचा तुकडा नसून आमच्या गोपाळ समाजाच्या स्वाभिमानाची आणि कायदेशीर अस्तित्वाची ओळख आहे. या दाखल्यांमुळे आता मुलांचे शिक्षण, रेशन व घरकुल योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे."


Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज