Top News

ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांची शिकार रोखण्याची युवक काँग्रेसची मागणी.


युवक काँग्रेस ब्रह्मपुरी विधानसभा अध्यक्ष सोनू नाकतोडे यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र व उपविभागीय कार्यालयावर धडक 

ब्रम्हपुरी प्रतिनिधी - संजय बागडे 

चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील महत्त्वपूर्ण वन्यजीव क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रम्हपुरी वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची कथित अवैध शिकार रोखण्यासाठी युवक काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच अवैध शिकारीच्या प्रकारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

युवक काँग्रेसचे ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ब्रम्हपुरी येथील उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील तसेच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले.

ब्रम्हपुरी परिसरातील विस्तीर्ण जंगलामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ, नीलगाय, रानडुक्कर यांसह विविध प्रजातींचे वन्यजीव व पक्षी आढळतात. या वनक्षेत्रातून वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात हालचाल होत असल्याने ब्रम्हपुरी परिसराचे वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, परिसरातील काही नागरिकांकडून वन्यप्राण्यांच्या अवैध शिकारीबाबत माहिती व चर्चा समोर येत आहेत. त्यामुळे या बाबींची वनविभागाने गांभीर्याने दखल घेऊन जंगल परिसरात गस्त वाढवावी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे आणि अवैध शिकारीमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

वन्यप्राण्यांचे संरक्षण हे पर्यावरणीय समतोलासाठी महत्त्वाचे असून, जंगलातील वन्यजीव सुरक्षित राहण्यासाठी वनविभाग, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.


निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कृ. उ. बा. स. सभापती प्रभाकर सेलोकर, डॉ. एन. एस. कोकोडे, प्रदेश सचिव थानेश्वर कायरकर, अल्का खोकले, वासुदेव सोंदरकर, मुन्ना रामटेके, पुष्पाकर बांगरे, संदीप बगमारे, गाझी पटेल, सोमेश्वर उपासे, अरुण अलोने, राममोहन ब्राडिया, केशव करंबे, अतुल राऊत, अमित कन्नाने, प्रिन्स नंदुरकर, गौरव भेंडारकर, श्रीकांत मेश्राम, मोहन मिसार, सुधांशु अलोने, आकाश राऊत, शुभम कावळे, तेजस दोनाडकर, आदित्य बोरकर, रोहित मेश्राम, विवेक राऊत, विवेक पावडे, जागृत ठेंगरे, पंकज भोयर, हिमांशू अनवानी, माधव उरकुडे, वैभव पारधी, शिवम मेहेर, समीर भानारकर, अमित सोनवाने, कुणाल भोयर, अंकुश रामटेके, विकास मडावी, आशिक डांगे, पंकज कोलते, आदित्य शंभरकर, किशोर गोठे, धीरज तुपट, रोशन गुरपुडे, समीर नाकतोडे, राजेश नाकतोडे, आशिक माटे, गजानन मिसार, विलास बोकडे, लखन नाकतोडे, साजन कुत्तरमारे, प्रभास तराले यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वनविभाग या निवेदनाची दखल घेऊन वनक्षेत्रातील गस्त व निगराणी वाढवून वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज