३०लाखाच्या प्लाॅटचे कंपाऊंड तोडले, पिता -पुत्रावर गुन्हा.
नागभीड प्रतिनिधी संजय बागडे - शहरात रीतसर खरेदी केलेल्या प्लाॅटचे कंपाऊंड तोडून अश्लील शिवीगाळ करीत जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून विठ्ठल मंदिर चौकातील रहिवासी पिता -पुत्रावर विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. वृत असे की,नागभीड येथील तहसिल रोड परिसरात राहणारे नामवंत सराफा व्यावसायिक अनिल नामदेवराव लांबट (६९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, त्यांच्या घराशेजारी वसंत वारजुरकर यांच्या मालकीचा २३३०चौ.मीटरचा मोकळा प्लांट क्रमांक (२१/१-२१)होता.हा प्लाॅट खरेदी करण्यासाठी लांबट यांनी २२आॅगष्ट२०२३रोजी ३० लाख रुपये किंमत खरेदी करार केला होता.त्यानंतर २सप्टेबर२०२६ ला मुळ मालक वसंत वारजुरकर यांनी नागभीड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सदर प्लाॅटची रीतसर विक्री लांबट यांच्या पत्नी लक्ष्मी लांबट यांच्या नावाने करून दिली.त्या जागेचा ताबा सोपविला.
नंतर लांबट यांनी १७सप्टेबर रोजी तिथे सिमेंट चे खांब व प्लेट्स लावून सुरक्षिततेसाठी पक्का कंपाऊंड तयार केले होते.मात्र१८सप्टेबर २०२६ ला सकाळी ( ८:१५ ) अशोक वारजुरकर व त्यांचा मुलगा संकेत वारजुरकर दोघे प्लाटवर आले.हा प्लांट आमचा आहे,,असा दावा करीत त्यांनी लांबट यांनी बांधलेला सिमेंट कंपाऊंड तोडण्यास सुरुवात केली
.कंपाऊंडच्या भिंती तोडून आत शिरल्या चे दिसताच अनिल लांबट हे मुलं राहुल प्रफुल यांच्या सोबतीने त्यांना अडविण्यासाठी गेले.त्यावेळी आरोपींनी अत्यंत संतप्त होऊन लांबट कुटूंबियांना अतिशय अश्लील -घाणेरडी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
प्लाटमध्ये आलात तर जिवानीशी ठार मारु,,अशी धमकी दिली.तसेच लांबट यांच्या पत्नी व सुनेला अपमानास्पद व. लज्जास्पद शब्दांत शिवीगाळ केली. वाद सुरू असताना संकेत वारजुरकर याने लगतचा बोल्डर गिट्टीचा दगड उचलून अनिल लांबट यांच्यावर भिरकावला.त्यामुळे डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
त्याक्षणी आरोपी पिता -पुत्राने राहुल व प्रफुल लांबट दोघांनाही जबर धक्का -बुक्की करीत खाली पाडले.यात राहुल च्या खांद्याला व डाव्या पायाला जबर मार लागला.तर प्रफुलच्या उजव्या हाताला दुखापत झाली.
या तक्रारीवरून नागभीड पोलीसांनी आरोपी संकेत अशोक वारजुरकर आणि अशोक वारजुरकर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (बि एन एस),२०२३च्या कलम ११८(१),११५(२),२९६,३२९(३),३५२,३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.भरदिवसा घडलेल्या या मारहाणीच्या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार करीत आहे.
Post a Comment