Top News

सोनोरी गावात वाघिणीची दहशत २२ वर्षीय तरुणी ठार.

 वाघिणीच्या शिकारात मृत झालेली शेळी 

चांदुर बाजार तहसील मधील सोनोरी गावात वाघिणीची दहशत.

अमरावती प्रतिनिधी अविनाश गोंडाणे 

सकाळी ११ वा चे दरम्यान सोमा नामक आदिवासी बांधव बकऱ्या चारण्यासाठी जात असतांना गावानजीकच्या अंबामाता परिसरातील नाल्याजवळ एका वाघिणीने बकरीवर हल्ला केला,त्यात एक बकरी मृत झाली व एक जखमी आहे. 

दुपारी ४ वा चे दरम्यान घराशेजारील असलेल्या शेतात चारा कापण्यासाठी गेलेल्या २२ वर्षांच्या उर्मिला इवने नामक तरूणीला मारले.

उर्मिला चारा करीत असताना वाघ तिच्या दिशेने येत असल्याचे पाहून झाडावर चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणीवर हल्ला चढवला व झाडीत फरफटत नेले. तरूणी मृतावस्थेत गावकऱ्यांना आढळून आली.

 त्यामुळे गावात संतापाची लाट उसळली. संतप्त जमावाने वनविभागाची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला असे समजते.

 वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. गावात असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज