Top News

धानाच्या बोनससाठी शेतकऱ्यांचा आक्रोश; नागभीडमध्ये चक्का जाम

तळोधी (बा.) ते नागभीड तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा; बहुसंख्य शेतकरी सहभागी
प्रतिनिधी - संजय बागडे 

नागभीड : धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाला हक्काचा बोनस मिळावा, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी (१७ सप्टेंबर) नागभीड तालुक्यात शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर तहसील कार्यालयावर निवेदन साद करण्यात आले.

तळोधी (बा.) येथील साई मंदिर परिसरातून शेतकरी व ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने शेतकरी आणि ट्रॅक्टर सहभागी झाल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. 'जय जवान, जय किसान', 'शेतकरी एकता जिंदाबाद' आणि 'धानाला हक्काचा बोनस मिळालाच पाहिजे', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

धान उत्पादनासाठी लागणारा वाढता उत्पादन खर्च, शेतीतील वाढती जोखीम आणि बाजारभावाच्या पार्श्वभूमीवर धान उत्पादकांना बोनस हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी काही काळ चक्का जाम करून आपला आक्रोश व्यक्त केला. त्यानंतर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

आंदोलनाला श्री. विनोद व. बोरकर, युवा नेते, चिमूर विधानसभा क्षेत्र तथा अध्यक्ष, श्रीलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, गिरगाव यांच्यासह विविध शेतकरी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

शासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

मोर्चा, चक्का जाम आणि तहसील कार्यालयातील निवेदनानंतर आता धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसच्या मागणीवर शासन व प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

"बळीराजाचा विजय असो!" या घोषणेसह आंदोलनाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज